Friday, December 5, 2014

Sant francis Xavier - ek avhan

संत फ्रांसिस झेवियरचे देहवशेष आज ३५० वर्षांनंतरही गोवा येथे जतन करण्यात आले आहेत. हा देवाचा आणि त्याचबरोबर निसर्गाचाहि एक महान चमत्कार आहे. सायन्सलाही एक आव्हान आहे. तिनवेळ पुरल्यानंतरही ते देहवशेष नष्ट न झाल्यामुळे देवाच्या महानतेचा एक अनुभव आपल्याला मिळतो.
ऐहिक सुखाची लालसा घेऊन जीवन जगण्याची इच्छा धरणारा एक सैनिक लोयोलाच्या मुखातुन निघालेल्या 'मनुष्यने सर्व जग कमावले आणि आत्मा गमवाला तर काय  लाभ?' या बाइबिल मधील वाक्याने योग्य कार्य केले. त्याचे परिवर्तन झाले आणि तो ख्रिस्ताचा सरदार बनला.
ख्रिस्तासभेने त्याला वर्तनसाक्षी म्हणून गौरविले आहे.त्याच्या वागणुकीत,आचरणात अमूलाग्र बदल झाला आणि तो ख्रिस्ताची सुवार्ता जगाला देऊ लागला. संध्याकाळच्या वेळी गवातून घंटी वाजवत लोकांना जमवून ख्रिस्तबद्दल ज्ञान देऊ लागला. इतिहास सांगतो की,झेवियरने सर्वात जास्त लोकांना बप्तिस्मा दिल आणि लाखो लोकांचे प्रायश्चित्त ऐकले।त्याचे मागदर्शन घेण्यासाठी त्यावेळचे कित्येक राजे,नेते,प्रतिनिधि,लोक त्याकडे येत असत.
ख्रिस्तसभा आज आपल्याला देखील आव्हान करात आहे की,आजच्या धकाधकीच्या जीवनात,मोहाच्या या दुनियेत पावलोपावली सैतान आपली वाट पाहत आहे. आपण देखील आपले कालपर्यंतचे कोणत्याही प्रकारचे वाईट  वर्तन सोडून देऊन आपल्या वर्तनात् बदल करावा आणि चांगले जीवन जगण्याचा  प्रयत्न करावा म्हणून परमेश्वराने  सर्वांना संधि द्यावि.
संत फ्रान्सिस झेवियरच्या सननिमित्ता सर्व येशुसंघीय सदस्यना शुभेच्छा.