संत फ्रान्सीस
झेवियर यांचा नोव्हेना प्रार्थना
धर्मगुरु - हे संत फ्रान्सीस झेवियरा भारताच्या प्रेषिता,आज आम्ही तुझ्या
गौरवार्थ येथे जमलो आहोत.प्रभुकडे तु आम्हासाठी मध्यस्थी कर.प्रभुच्या
मध्यस्थीद्वारे आम्हाला विशेष कृपादाने मिळवून दे.
लोक – हे आमच्या उद्धारक देवा,संत फ्रान्सीस
मुळे तुझा संदेश भारताला मिळण्याचे भाग्य तु आम्हाला दिलेस व त्याचे देहावशेष तुझा आशीर्वाद म्हणून
जपून ठेवलेस.आमच्या श्रदधेचा पिता म्हणून त्याचा स्विकार करण्यास आम्हाला अभिमान वाटतो.त्याचा सन्मान
करीत असता आमचे हदय प्रेमाने पेटव आणि भारतीय महामंडळाला प्रेषीत कार्याचा उदंड उत्साह दे.हे संत फ्रान्सीस
झेवियरा,आदर्श जीवन जगण्यास आम्हाला मदत कर.तुझ्या चरणी आज
आम्ही आलेलो आहोत.या नोव्हेनाच्या वेळी तुझ्या मध्यस्थीने जी मदत मागतो ती देवाच्या गौरवासाठी व
आमच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी आम्हाला मिळवून दे.
धर्मगुरु – माणसाने सर्व जग मिळवले व स्वत:चा आत्मा गमावला
तर त्याला काय लाभ या वचनाद्वारे तुझे परिवर्तन झाले.हे मुक्तीदात्या
प्रभु तुझे वचन आत्मसात करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर.
लोक – हे भारताच्या प्रेषीता,आम्ही तुझा
भक्तीभावाने सन्मान करतो.तु केलेल्या प्रेषीत कार्याने आम्हाला प्रोत्साहन मिळो.तु जगलेल्या
त्यागी जीवनाची आम्हा सर्वांना जाणीव होवो.आज स्वर्गराज्यात,गौरवशाली अवस्थेत,तु प्रभु येशु
ख्रिस्ताठायी एकरुप झालेला आहेस.आम्हाला तुझ्यासारखे सेवाकार्य करण्याची शक्ती मिळावी म्हणून
आम्ही प्रार्थना करतो.
धर्मगुरु – हे फ्रान्सीस झेवियरा,आमचे अंत:करण शुदध कर.आम्ही सर्व
वाईटांपासून व संकटांपासून दूर राहण्यासाठी तुझा आशीर्वाद मागतो.
लोक – येशुच्या महान
संता,तु माझ्या आपुलकीचा,जिव्हाळयाचा,प्रेमाचा एकत्र विषय आहे.तुझ्या जीवनापासून प्रेरणा घेण्यास मला प्रवृत्त कर.ज्या मुक्तीच्या
मार्गाने तु चाललास त्या मार्गाने चालण्यास मला सहाय्य कर.मी अशक्त आहे,दुबळा आहे.वाईट वासना,वाईट आचार-विचार,वाईट भाव-भावनांनी
व्यापलेला एक पापी आहे.म्हणून मी आज तुझ्या मध्यस्थीने परमेश्वराकडे दयेची याचना करीत आहे.तु माझ्या जीवनाचा
खरा मित्र हो.माझ्या हदयात तुझ्या दिव्यत्वाचा ठसा उमटव.तुझ्यासारखं त्यागमय व पवित्र जीवन जगण्यास मला सुदबुद्धी दे.
धर्मगुरु - हे संत फ्रान्सीस झेवियरा,तु प्रभु येशुचे
दु:ख व मरण अनुभवलेस.मानवाच्या तारणासाठी प्रभुने क्रुसावर आपले रक्त सांडले.ज्या आत्म्यांसाठी
हे रक्त सांडले गेले त्यातील एकही आत्मा गमावला जाऊ नये अशी तुझी उत्कट इच्छा आहे.तुझ्या या इच्छेत सहभागी होऊन एकनिष्ठेने तुझ्या जीवनाचा आदर्श घेऊन तुझ्या वैभवशाली
सदगुणांचे अनुकरण करावे म्हणून तु आमच्यावर कृपेचा वर्षाव कर.आमेन.
धर्मगुरु - लोकसमुदायाचे श्रदधा निवेदन
लोक – हे सर्वसमर्थ प्रभो,आमच्या प्रेमळ पित्या,तु आपला सेवक संत
फ्रान्सीस झेवियर याला अनेक देणग्या आणि कृपा बहाल केल्यास.तुझ्यावरील
प्रेमाने भरुन तु त्याला प्रेषीत कार्याची प्रेरणा दिलीस.तुझ्या
पुत्राच्या गौरवार्थ तुझ्या पुत्राच्या बांधवांसाठी संत फ्रान्सीस झेवियरने अनेक
देशांत अविश्रांत श्रम उचलले.तु या तूझ्या सेवकाला आमच्यासाठी मध्यस्थी आश्रयदाता केलेस.आमच्या राष्ट्रात
शांतता,प्रेम,विविध लोकांमध्ये,परस्परामंध्ये सलोखा नांदावा म्हणून हे संत फ्रान्सीस झेवियरा आम्ही तुझी विनंती
करीत आहोत.आमच्या राष्ट्रांस श्रदधादान देण्यासाठी तु परिश्रम घेतलेस, ख्रिस्ताच्या
प्रेमात स्थिर राहण्यास तु आम्हाला त्यांच्या शुभसंदेशाचा बोध केलास.आम्ही तुझे सहाय्य
मागत आहोत. त्याग आणि सेवाकार्याची आमच्यामध्ये आवड निर्माण कर.आमच्या
अडचणींमध्ये आम्ही तुझी मध्यस्थी मागत आहोत.तुझ्या
प्रार्थनेमुळे प्रभुख्रिस्ताकडून आमच्यासाठी कृपा व सामर्थ्य मिळव.आमच्या प्रत्येक
कृत्यातून प्रभुपित्याचा गौरव व्हावा ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभुख्रिस्ताद्वारे
करतो.आमेन.
·
आमच्या स्वर्गीय बापा व 3 नमो मारीया
प्रार्थना *