Tuesday, March 6, 2018



बंधु भगिनींनो,आपल्या खिस्ती धर्माच्या विश्वासाचा पाया भक्कम आहे.ख्रिस्ताला स्विकारलेल्या, अंगिकारलेल्या विश्वातल्या आजपर्यंतच्या सर्वच संत महंतांनी हा पाया रचला आहे. संत फ्रान्सीस झेवियर हा ही त्यांच्यापैकीच एक.तो भारताचा प्रेषीत आहे. ज्या ख्रिस्तावर त्याने विश्वास ठेवला त्याने त्याचे देहावशेष आज 450 वर्षानंतरही सुरक्षीत ठेऊन जगाला आशा दिली आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.तो देहावशेषाने आपल्यामध्ये जीवंत आहे.तो आपल्याला ख्रिस्तावरचा आपला विश्वास दृढ राखण्यास आवाहन करीत आहे, प्रेरणा देत आहे.ज्ञाता कडून अज्ञाताकडे नेणा-या या संताने धर्मशिक्षण,प्रायश्चित्त संस्कार,गरीबांची सेवा यावर भर दिला. सणाच्या यादिवशी त्याच्या मध्यस्थीने आपल्याला आपला विश्वास दृढ राखण्यास,अधिकाधीक ख्रिस्ताच्या जवळ जाण्यास, धर्मशिक्षणाचे महत्व ओळखून अनुकरण करण्यास,गरीबांच्या सेवेत पुढाकार घेण्यास,प्रायश्चित्त संस्कारावर विश्वास ठेवण्यास आणि त्याच्या प्रेमाचा अनुभव घेण्यास सहाय्यक ठरावा आणि जाणीवेतून नेनीवेकडे नेण्यासाठी हा सण लाभदायी व्हावा यासाठी या संत फ्रान्सीसच्या मध्यस्थीने  प्रार्थना करुया.

No comments:

Post a Comment